
कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक ०१.१२.२०२४ रोजी वेळ 9 ते 4 या वेळेत हॉटेल ऐरावत, गणपती मंदिर जवळ गडहिंग्लज येथे मोफत वंध्यत्व निवारण तपासणी शिबीर (IVF) व मोफत हृदय चे आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.बदलती जीवनशैली व धकाधकीचे जीवन या मुळे तरुण नवविवाहीत दांपत्या मध्ये वंध्यत्वा ची समस्या अधिक वाढते आहे. वेळेत गर्भधारणा होण्या साठी स्त्री-पुरुष दोन्ही चे प्रजनन क्षमता योग्य असणे गरजेचे असते. नवविवाहीत दांपत्या मध्ये गर्भधारणा संदर्भातील विविध समस्या साठी सिद्धगिरी हॉस्पीटल येथे वंध्यत्वावर मात करण्यासाठी होलिस्टिक आयव्हीएफ,विभाग आधुनिक तंत्रज्ञान,आणि आयुर्वेदाची अव्दितीय उपचार पध्दती अत्याधुनिक व सुसज्ज IVF विभाग डॉ वर्षा पाटील यांच्या संचालना खाली सुरू करण्यात आला आहे. माफक दरात IVF उपचार उपलब्ध करूण सर्वसामान्य लोकांना आपत्य सुख देण्यासाठी गेले दोन वर्षा पासून IVF सेंटर कार्यरत आहे.तसेच हृदयाचे आरोग्य ही महत्वाचे आहे सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये माफक दरात सीटी स्कॅन, अत्याधुनिक एम.आर.आय.. डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब या सुविधा एकाच छताखाली असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सेवाभावी संस्था श्रेणीतील अग्रेसर व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे.तरी गडहिंग्लज येथे आयोजित मोफत वंध्यत्व निवारण तपासणी व मोफत हृदय तपासणी शिबीर यांचा लाभ सर्व गरजू व्याक्तीनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Leave a Reply