
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा आसपासच्या सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह सीमा भागाशी निगडीत असून, या सर्वांचे केंद्र स्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्हा विविध कलागुणांना वाव देणारा जिल्हा असून, कोल्हापूर जिल्ह्यात इंजिनीअरींग असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, बार कोन्सील अशा विविध संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु, विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यामुळे विचारांचे आदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यावर पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक सोयी सुविधांनी युक्त आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर निर्मिती करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास प्रशासकीय मंजुरी दिली होती. यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा याकामी सातत्याने पाठपुरावा केला असून, कन्व्हेन्शन सेंटरसाठी रु.२५२.१६ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नियोजन विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधेची कामे करणे या योजनेअंतर्गत दि.०८ जानेवारी रोजी रु.५० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास पुन्हा यश आले आहे.
नियोजन विभागाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी राजाराम तलाव येथील जागा प्रस्तावित केली आहे. यासंदर्भात कोल्हापूर मध्ये राजाराम तलावाच्या बाजूला कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याबाबत सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन हजार प्रेषक क्षमतेचे अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या अर्थसंकल्पात कन्व्हेन्शन सेंटरसाठी निधीची तरतूद होण्याची मागणी केली होती. यानंतर कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. यानंतर कन्व्हेक्शन सेंटरची प्रक्रिया शासकीय पातळीवर सुरु होती. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहीतेच्या पूर्व संध्येपूर्वीच आमदार राजेश क्षीरसागर यांनी एक मास्टर स्ट्रोक लगावत कोल्हापूर शहराच्या राजाराम तलावाकाठी प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरची प्रशासकीय मान्यता घेण्यात यश मिळविले होते. त्यामुळे कन्व्हेक्शन सेंटरचे काम आचारसंहितेच्या कात्रीतून बाहेर सुटण्यास मार्ग मोकळा झाला होता.
Leave a Reply