कोल्हापूर : डॉ. चेतन नरके यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप पाडली आहे. त्यांच्या दुग्ध व्यवसायातील ज्ञानाचा उपयोग करून जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी दुग्ध व्यवसाय बळकट करावा. कमी खर्चात जास्त दूध उत्पादन घेऊन ‘गोकुळ’चे नाव देशपातळीवर पोहोचवा, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी केले.
‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील २८ अधिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते
करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील आदर्श दूध उत्पादक शेतकऱ्यांचा ‘गौरव समारंभ’ अत्यंत उत्साहात पार पडला.याप्रसंगी छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. चेतन नरके यांच्या कार्याची दखल घेत समाजहिताच्या कामाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिला.
अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक संदीप नरके, अनिल बरगे, सत्यशील नरके आदी उपस्थित होते.
यावेळी दूध उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनी, मित्रपरिवार, सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी तसेच असंख्य परिचित–अपरिचित मंडळी उपस्थित होती.
दरम्यान, डॉ. चेतन नरके यांना केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार जयंत आसगावकर आदींनी फोनवर व भेटून शुभेच्छा दिल्या.

3patticrown111, huh? Never heard of it. Website looks kinda sketchy, so tread carefully. Might be legit, might be someone’s side hustle. Do your research before throwing any money around. Play safe on 3patticrown111.