आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

 

आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

कोल्हापूर: श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंगची संलग्न संस्था वैदिक धर्म संस्थान, कोल्हापूर सातत्याने १८ वर्षापासून शरद नवरात्रोत्सवामध्ये महाचंडी होम सह विविध होम, पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत आहे. याही वर्षी हे होम दि. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत सकाळी आठ पासून आयर्विन मल्टी पर्पज हॉल, गवत मंडई, शाहूपुरी येथे होत आहेत.हे सर्व होम आणि विधी स्वामी अच्युतजी यांच्या पावन उपस्थितीत होत आहेत. बेंगळूरू स्थित वेद विज्ञान महा विद्यापीठ मधील प्रशिक्षित पंडित आणि सहकारी हे विधी करणार आहेत.अशी माहिती डिंपल गजवानी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या म्हणाल्या रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री. महा गणपती होमापासून सुरवात होऊन श्री. सुब्रमण्यम होम, वास्तू होम आणि नवग्रह होम होतील.सायंकाळी ५.३० वाजता महा सुदर्शन होम आणि श्री. महालक्ष्मी होम होतील. सुदर्शन होमा मध्ये साधक सुदर्शन क्रिया करतात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि रास दांडिया होईल.

सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रुद्र पूजा आणि रुद्र होम तर सायंकाळी ५.३० वाजता महा चंडी कालास्ज स्थापना आणि चंडी पारायण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता महा चंडी होम होईल. यामध्ये गो पूजा, कन्या पूजन, सुहासिनी पूजन आणि दांपत्य पूजन असते.या सर्व होम आणि पूजा यांच्या मंत्रोच्चारामध्ये उपस्थितांना गहऱ्या ध्यानाचा अनुभव प्राप्त होतो. या सर्व विधींमुळे उपस्थितांच्या जीवनातील तसेच सभोवतालच्या वातावरणातील ताण तणाव आणि नकारात्मकता कमी होत असल्याचा अनुभव मिळतो.

दैनंदिक सत्संग होणार असून महाप्रसादाची सोय आहे.हे सर्व होम आणि विधी सर्वांसाठी खुले असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समन्वयक दिव्या चांदवानी आणि आशिष चंदवानी यांनी केले आहे.नवरात्र ही केवळ उत्सव नाही तर ती आपल्या आत्म्याशी जोडले जाण्याची संधी आहे. ती एक आत्म निरीक्षण आणि ध्यान करण्याची संधी आहे, ज्यामुळे आसक्ती, द्वेष, जडत्व आणि नकारात्मकता नाहीसे होण्यास मदत होते” असे गुरुवर्य श्री श्री रविशंकर म्हणतात.पत्रकार परिषदेस प्रणव लोळे, दिव्या चंदवानी, आशिष चंदवाणी, राजेंद्र लकडे आदी उपस्थित होते.

One response to “आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम”

Leave a Reply to bestjiligames Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!