क्रिडाईच्या क्लस्ट ॲपमुळे मिळणार बांधकामविषयक सर्व माहिती

 

कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूरने क्रीडाई क्लस्ट ॲप्लिकेशन नावाचे ॲप तयार केले असून या ॲपचे अनावरण महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. क्रिडाईच्या मासिक सभेत या ॲपचे अनावरण झाले.
यावेळी अध्यक्ष के. पी. खोत यांनी क्रिडाई कोल्हापूर आयोजित गृहप्रकल्प बांधकामविषयक व वास्तूविषयक प्रदर्शन ३० जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान महासैनिक दरबार ग्राऊंडवर आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, सहसचिव निखिल शहा, क्रिडाई कोल्हापूरचे माजी अध्यक्ष महेश यादव, क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर उपस्थित होते.
बांधकाम व्यावसायिक व बांधकाम साहित्य विक्रेत्यांना, कॉन्ट्रॅक्टर, सेवा पुरवठादार, बँक यांना एकाच अॅपमध्ये समाविष्ट करून क्रिडाई सभासदांना त्याचा लाभ घेता येणार आहे त्यांना विक्रेत्यांची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. दालनासाठी महेश यादव यांची अध्यक्ष म्हणून आणि निखिल शहा यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली. गणेश सावंत यांनी यावे आभार मानले.

One response to “क्रिडाईच्या क्लस्ट ॲपमुळे मिळणार बांधकामविषयक सर्व माहिती”

Leave a Reply to apostamaxbet Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!