‘क्लीन कोल्हापूर’ मोहिमेअंतर्गत अंबाबाई मंदीर परिसरात उद्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन

 

कोल्हापूर : प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि कोल्हापूरातील विविध स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्यावतीने गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘क्लीन कोल्हापूर’ ही स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. श्री अंबाबाई मंदीर परिसरात बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता या मोहिमेचा प्रारंभ होणार असल्याची माहिती सौ. प्रतिमा सतेज पाटील यांनी दिली. स्वच्छतेच्या अभावामुळे सध्या सर्वत्र डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू या सारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे कित्येक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे आपले शहर, गांव व आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कोल्हापूरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून ‘क्लीन कोल्हापूर’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्र उत्सव हा चांगले काम करण्यासाठी उर्जा देणारा उत्सव ठरतो. या उत्सवातून सकारात्मक उर्जा घेवून ही मोहिम सुरु केली आहे.
बुधवारी होणाऱ्या ­या मोहिमेच्या वेळी महापौर सौ. माधवी गवंडी, उपमहापौर भूपाल शेटे उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेमध्ये कोल्हापूर रोटरी मुव्हमेंट २०१९-२०, इनरव्हील क्लब ऑफ मुव्हमेंट, कोल्हापूर प्रेस क्लब, ऑयस्टर जैन्स ग्रुप, क्रिडाई कोल्हापूर, मुक्ता, अवनि, एकटी, व्हाईट आर्मी, अमिताभ फॅन्स क्लब वल्र्डवाईड, गार्डन क्लब सिमंतीनी मराठा महिला मंडळ, दिलासा सामाजिक संस्था, रणरागिणी ग्रुप, आदी सामाजिक व स्वयंसेवी संस्था तसेच विद्यार्थी, महिला बचतगट सहभागी होणार आहेत. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने विशेष सहकार्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!