
मुंबई: दरवर्षीभारतात 2.4 लाख मुलांना जन्मजात हृदयरोग असतो आणि त्यातील एक पंचमांश मुलांना त्यांच्या पहिल्या वर्षातच खास उपचारांची गरज भासते. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने, नारायण हेल्थच्या एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलने समाज सेवा अंतर्गत, सरकारच्या विविध योजनांअंतर्गत दरमहा 200 गरजू हृदयविकार बालरूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचे जाहीर केले. नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी यांनी जागतिक हृदय दिन 2019 च्या निमित्ताने लहान रूग्णांना भेट देऊन एनएच- एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, मुंबई येथील काही ठरावीक बाल रुग्ण तज्ञ डॉक्टरांना संबोधित केले.पिडीत एक हजार लहान मुलांवर हृदयविकार शस्त्रक्रिया करणाऱ्या एनएच- एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलने भारतातील बालरोगशास्त्र क्षेत्राची समीकरणे नव्याने प्रस्थापित केली असून हॉस्पिटलद्वारे सुपर- स्पेशॅलिस्ट केयर आणि कमीत कमी छेद केल्या जाणाऱ्या ट्रान्सकॅथेटर तंत्रासह तंत्रज्ञानविषयक नव्या घडामोडी आणि दर्जेदार सर्जिकल तसेच इंटरव्हेंशन्शल उपचार जन्मजात हृदयरोग असणाऱ्या मुलांसाठी वापरले जातात.नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी म्हणाले, ‘आयुषमान भारतमुळे भारतातील हृदयरोग शस्त्रक्रिया विशेषतः लहान मुलांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढेल. यशस्विनी या लघु आरोग्य विमा कंपनीने 15 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरही तिचा प्रभाव प्रामुख्याने दक्षिण आणि पश्चिम भारतात राहिला, मात्र आयुषमान भारतमुळे उत्तर, केंद्रीय आणि पूर्व भारतातील कुटुंबांनाही फायदा होईल. नारायण हेल्तच्या बेंगळुरू येथील हॉस्पिटलद्वारे 76 देशांतील मुलांवर 12- 16 हृदयरोग शस्त्रक्रिया केल्या जातात आणि हृदयरोग शस्त्रक्रियांचा खर्च कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशा शस्त्रक्रियांची संख्या वाढवणे. नारायण हेल्थमध्ये आम्ही आरोग्यसेवा तसेच हृदयरोगसेवांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी तसेच रुग्णांना वेळेवर निदान, उपचार व काळजीसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ खुले करून देण्यासाठी गुंतवणूक करत आहोत.’
Leave a Reply