
कोल्हापूर : शहरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक ध्रुव रेसिडेन्सीसमोर (राजहंस प्रिटींग प्रेसजवळ) कसबा बावडा रोड येथे ड्रेनेज कामात कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. यामुळे सदर भागात ड्रेनेजचे मैलायुक्त दुर्गंधीयुक्त पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर व परिसरातील सर्व घरांच्यासमोर रस्त्यावर पसरून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाला असून, रेसिडेन्सीसमोर (राजहंस प्रिटींग प्रेसजवळ) कसबा बावडा रोड येथे जनआंदोलनाचे नेतृत्व आज माजी आमदार राजेश क्षीरसागर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी केले. आयुक्तांशी बोलन झाले असुन १५ दिवसांत रस्ता चालु नाही झाला व जनतेला न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करु असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
Leave a Reply