
कोल्हापूर :नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून माणुसकीची भिंत आज शनिवारी सायंकाळी सहा पासून सुरू होत आहे. उद्या रविवार (दि.27) व सोमवार (दि.28) या दोनदिवस सीपीआर चौकात आयोजीत केली आहे. जूनी परंतू वापरा योग्य कपडे घेवून ती गरजूंना या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत. सहा वाजता आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली. वापरण्यायोग्य जुनी-नवी कपडे दान करावीत तसेच गरजूंनी त्याचवेळी घेवनू जावीत, असे आवाहन संयोजकांनी आहे.
आगळी वेगळी सामाजिक दिवाळी म्हणून प्रसिध्द झालेला माणुसकीची भिंत हा उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. गेल्या तीन वर्षात या उपक्रमाला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी मोठा उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.या उपक्रमासाठी कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन आणि पुरूष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री सात वाजपर्यंत कपडे जमा व वाटप केले जाणार आहेत. या कालावधीत जमा झालेले कपडे शिल्लक राहिल्यास ते उस तोडणी कामगारांना वाटप करण्यात येणार आहेत. तसेच शिल्लक राहिलेल्या इतर कपड्याच्या पिशव्या शिवून त्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. काही कपड्यापासून अंगावरील पांघरुन शिवून ते फिरस्त्यांना देण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, सचिन चव्हाण, गणी आजरेकर, प्रसाद पाटील, सुधर्म वाझे, सचिन पाटील, संतोष पाटील, संदीप नष्टे, प्रशांत पोकळे, डॉ देवेंद्र रासकर, सुखदेव गिरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
Leave a Reply