
कोल्हापूर : सातव्या जेएसटीएआरसी तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने बाजी मारली. तब्बल 18 सुवर्णपदके, 21 रौप्य तर 13 कास्य पदके पटकावत हा संघ विजेता ठरला. कोल्हापुरात पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, सातारा, बेंगलोर, पालघर येथून एकूण 133 स्पर्धक स्परिंग या तायक्वांदो प्रकारात सहभागी झाले होते. तर डेमॉन्स्ट्रेशन या प्रकारात एकूण 46 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांच्या हस्ते संपन्न झाला. जेएसटीएआरसी कोल्हापूर संघास मास्टर अमोल भोसले आणि मास्टर नवीन दिवे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूरला क्रीडा परंपरा आहे. हीच परंपरा पुढे नेत हे स्पर्धक कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर नक्कीच उंचावतील, अशी आशा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. प्रकाश भोसले, श्रीमती लता भोसले यांनी स्पर्धेचे संयोजन केले. यावेळी विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply