
कोल्हापूर: भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याची संघटनात्मक व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस तसेच भाजपा महाराष्ट्र निवणूक अधिकारी सुरेश हाळवणकर यांच्यासह भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित होते. सुरेश हाळवणकर म्हणाले, लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालाआहे.याअनुषंगाने दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत बुथप्रमुख, सक्रीय सदस्यता नोंदणीअभियान पूर्ण करावयाचे आहे. त्यानंतर 21 ते 30 नोव्हेंबर पर्यंत मंडल (तालुका) स्तरावरील निवडणूक पूर्णकरायाच्या आहेत. दिनांक 10डिसेंबर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करायाचा आहे.त्यानंतर 15 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रप्रदेशाध्यक्ष निवड पूर्ण होणारआहे. संघटनात्मक निवडणुकीच्याकार्यक्रमामध्ये पक्षाच्या सर्व पदाधिकारीव कार्यकर्ते यांनी आपला 100%सहभाग नोंदवावा असे आव्हानकरण्यात यावेळी करण्यात आले. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभानिवडणुकीसंदर्भात त्या बैठकीमध्येव्यापक आढावा घेण्यात आला. जय-पराजयाचा विचार न करता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने पक्षवाढीसाठी कार्यरत व्हावे असे सांगितले. याप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटनमंत्री बाबा देसाई,सरचिटणीस विजय जाधव, शिवाजीबुवा, दिलीप मैत्रानी, हेमंत आराध्ये, गोपाळराव पाटील, भरमू आण्णा पाटील, महिला आघाडी अध्यक्षा विजया पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, नगरसेवक, जि.प., प.स. सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. शिवाजी बुवा यांनी उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांचे आभार मानले.
Leave a Reply