प्रेक्षकांच्या भेटीस येतोयं ‘कॉपी’

 

एखाद्याचं शैक्षणिक जीवनच उद्ध्वस्त करणा-या या ‘कॉपी’चा नवा अर्थ चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच या सिनेमाचं शीर्षकही कॉपी असं ठेवण्यात आलं आहे. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सचा आशयघन सिनेमा येत्या 8 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.‘कॉपी’ या शीर्षकाचा सिनेमा बनवण्याची मूळ संकल्पना असलेल्या गणेश रामचंद्र पाटील यांनीच या सिनेमाची निर्मितीही केली आहे. पलाश वधान यांच्या भारत एक्सीमची प्रस्तुती असलेल्या ‘कॉपी’चा मोशन पोस्टर लाँच झाल्यापासून सिनेसृष्टीपासून सिनेरसिकांमध्ये या सिनेमाविषयी कुतूहल आहे. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.तसेच त्यांनी राहुल साळवे यांच्या साथीने या सिनेमाची कथासुद्धा लिहिली आहे.
दयासागर आणि हेमंत यांनीच या सिनेमाची पटकथाही लिहिली आहे. दयासागर यांनी एक पाऊल पुढे टाकत अर्थपूर्ण संवादलेखन केले आहे. आजवर कधीही समोर न आलेलं कथानक ‘कॉपी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणलं आहे. खेडयातील शाळांमधील कथानक सादर करत आज महाराष्ट्रातील शाळांमध्ये कशाप्रकारचा कारभार सुरू आहे त्याचं ज्वलंत चित्रच त्यांनी मोठया पडद्यावर रेखाटलं आहे. एशियन फिल्म फेस्टिव्हल, लॉस एंजेलिस सिने फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव, 55 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा तसेच इतर नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणं हे ‘कॉपी’चं आणखी एक वैशिष्टय आहे. अभिनयाची चौकट मोडून आपली कला सादर करणारे कलाकार या सिनेमात आहेत. अभिनेता अंशुमन विचारे शिक्षकाच्या गंभीर भूमिकेत, जगन्नाथ निवंगुणे यांनी शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या दोघांना मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, निता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मदुशिंगरकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतिक्षा साबळे, शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक, सिद्धी पारकर, सानिका निर्मल, सिद्धी पाटणे आणि विद्या भागवत आदी कलाकारांची साथ लाभली आहे. राहुल साळवे यांनी गीतलेखन केलं आहे. नव्या दमाचे संगीतकार रोहन-रोहन यांच्या जोडीला वसंत कडू यांनी यातील गीतांना संगीत दिलं असून ध्वनी समीर शेलार यांचे आहे. या चित्रपटाचं छायांकन सँटिनिओ टेझिओ यांनी केलं असून संकलनाची जबाबदारी संजय इंगळे यांनी पार पाडली आहे. संदिप कुचिकोरवे कलादिग्दर्शन असून रविंद्र तुकाराम हरळे कार्यकारी निर्माते आहेत. मेकअपमन लिली शेख असून जय घोंगे, तपिंदर सिंग, साकेत चौधरी, नवनाथ गोवेकर प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा हा सिनेमा प्रत्येकाने पहायला हवा असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!