
कोल्हापूर : सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंप हा सामाजिक कार्याबरोबर डिझेल व पेट्रोलच्या उच्चांकी विक्री बद्दल दक्षिण महाराष्ट्र मध्ये अग्रेसर आहे यावर्षी देखील पेट्रोल व डिझेल ब्रॅण्डेड फ्युएल साठी संपूर्ण झोनमध्ये अग्रेसर हा पंप आहे. त्यामुळे या पंपाच्या पेट्रोल व डिझेलची उच्चांकी विक्री झाल्याने हिंदुस्थान कंपनीच्या वतीने कोरगांवकर पेट्रोल पंपाचे अमोल कोरगावकर यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. हिंदुस्तान पेट्रोलियम च्या डीलर ची बैठक झाली. या बैठकीमध्ये हे पारितोषिक त्यांना देण्यात आले.हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी चिफ रिजनल मॅनेजर मंजुनाथ भट व कोल्हापूर सेल्स ऑफिसर हर्षद कुंभार यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना पंपाचे मालक अमोल कोरगावकर यांनी या उच्चांकी विक्री बद्दल पंपाच्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे यासाठी मोठे योगदान असल्याचे बोलून दाखविले.या कार्यक्रमाला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी सर्व डीलर व कोरगावकर कुटुंबीयांचे अमोल कोरगावकर, अशिष कोरगावकर ,आकाश कोरगावकर, ओम कोरगावकर व राज कोरगावकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply