
अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित व प्रणय चोकसी आणि ‘डान्सिंग शिवा’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’मधील अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या सोनाली कुलकर्णी व स्पृहा जोशी यांच्या वेगळ्या लुकला आणि ‘मास्क मॅन’च्या झलकला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘विक्की वेलिंगकर’चा नवीन टीझर निर्मात्यांकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरनेही समाजमाध्यमांवर हलचल निर्माण केली असून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी,स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार,गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply