शेकापक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

 

कोल्हापूर: शेतकरी कामगार पक्ष्याच्या वतीने आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. संतप्त आंदोलकांनी प्रवेश द्वाराचे कुलूप तोडून जिल्हाधिकारी कार्यालय घुसण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मंगळवारी माजी आमदार संपत बापू पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. दुपारी बारा वाजता दसरा चौक येथून मोर्चा सुरुवात झाली. मोर्चाच्या सुरुवातीला बैलगाडी मध्ये शेतकऱ्याचा आक्रोश आणि व्यथा मांडणारी फलक लावले होते. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात यावेळी येत होती. त्यामध्ये बैलांची संख्या उल्लेखनीय होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला यावेळी पोलिसांनी गेटवर मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला. संतप्त शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करीत धडक गेटला दिली.या धडकेत दरवाजा उघडला. शेतकरी व पोलिसांची झटापट झाली. यावेळी माजी आमदार संपत बापू आणि पोलिसांच्या जोरदार खडाजंगी उडाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे वीस मिनिटे हा ही झटापट सुरू होती. त्यानंतर माजी आमदार संपत पवार यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलक शांत झाले. आणि त्यांनी प्रवेशद्वारासमोर प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना पात्र शेतकऱ्यांना मिळावी, कर्जमाफीला प्रोत्साहन द्यावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापारी शेतकऱ्यांना मूल्यांकन ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, कृषी वीजपंप, पाईपलाईन मिळावी. वीज मीटर बदलून द्यावेत, सरकारी पाणीपट्टी माफ करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, दत्तात्रय पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबुराव कदम, केरबा पाटील, अशोकराव पवार, अंबाजी पाटील, संतराम पाटील, राजेंद्र देशमाने,बाबासो देवकर, अमित कांबळे, सरदार पाटील यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!