
कोल्हापूर : कोल्हापूरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वैभव असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलचे निर्माते आणि विशेषतः विक्रेते यांना बाजारामधील नवप्रवाहांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या विपणन पद्धतीमध्ये कालसुसंगत बदल घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रतिबद्ध आहे. त्या दृष्टीनेच विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून थेट कोल्हापूरच्या चप्पल लाईनमध्येच एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एका अर्थाने या चप्पल विक्रेत्यांच्या कौशल्य विकासासाठी ‘विद्यापीठ आपल्या दारी’आले आहे, अशी भावना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आणि कोल्हापुरी चप्पल क्लस्टरच्या सहकार्याने चप्पल लाईन येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय ऑन-फिल्ड प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आज सकाळी ते बोलत होते
Leave a Reply