
कोल्हापूर : इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने न्यू पॅलेस येथील महापालिकेच्या शाळा नंबर १५ ला मदत करण्यात आली. क्लबच्या ‘हॅप्पी स्कूल’ उपक्रमाअंतर्गत ही मदत करण्यात आली. यामध्ये शाळेतील 4 वर्ग डिजिटल करण्यात आले. तसेच ग्रीन बोर्ड, ३२ इंची स्मार्ट, हँडवॉश स्टेशन क्रीडा साहित्य, पन्नास झांज, शर्ट आणि वाचनालयासाठी पुस्तके असे शालेय उपयोगी देण्यात आले.जिल्हा अध्यक्ष सौ. नंदा झाडबुके यांच्या हस्ते या शाळेला ‘हॅपी स्कूल’ असे गौरविण्यात आले आणि उद्घाटन करण्यात आले.इनरव्हील क्लब ऑफ सनराईजच्या मार्फत नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात. भावी पिढी सुशिक्षित घडावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचे क्लबच्या अध्यक्षा सौ.वसुधा लिंग्रस यांनी सांगितले.
यावेळी सचिव डॉ.मयुरा खोत, यांच्यासह क्लबचे पदाधिकारी, सदस्य ,व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
Leave a Reply