माणूस इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक व्यसनाच्या आहारी: डॉ.अनिल अवचट ;प्रसूतीतज्ञांच्या वैद्यकीय परिषदेचा समारोप

 

कोल्हापूर: बदलत्या जगात इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी माणसावर आक्रमण केलेले आहे. माणूस इंटरनेट माध्यमांचा आहारी गेलेला आहे. खूप शिकलेला असल्यामुळे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. म्हणूनच इतर व्यसनांच्या सारखे हे व्यसन सोडवणे सोपे नाही, असे परखड मत बहुआयामी लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. नुकत्याच पार पडलेल्या प्रसूति शास्त्रज्ञांच्या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ‘इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे व्यसन’ यावर त्यांनी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. माणसाला यातून बाहेर काढणं अतिशय अवघड आहे असेही डॉ. अवचट म्हणाले. वैद्यकीय परिषदेमध्ये गरोदर स्त्रियांमध्ये होणाऱ्या शारीरिक गुंतागुंत व त्याचे आई व बाळावर होणारे दुष्परिणाम त्यावर करण्यात येणारी उपाययोजना यावरती चर्चा करण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय कीर्ती असणाऱ्या फर्नांडीज हॉस्पिटल मधील स्त्री रोग तज्ञ यांच्या गटाने प्रसूतीदरम्यान होणाऱ्या घडामोडींवर विस्तृतपणे चर्चा केली. प्रसूती सुयोग्य करताना त्यांची सुरक्षितता कशी जपायची यावर ऊहापोह करण्यात आला. यावेळी स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मंजुळा पिशवीकर, सचिव डॉ. अनघा कुलकर्णी, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. गौरी प्रसाद, डॉ. ज्योत्स्ना देशमुख, डॉ. शीतल देसाई यांच्यासह तज्ञ डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!