
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य संध्याराणी बेडगे यांनी महिलांना स्वावलंबी महिलांसाठी कापडी पिशव्या बनवण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण नेहमी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दिले जाते.
सध्या प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करता कापडी पिशवी यांना भरपूर मागणी आहे. काम करू इच्छिणाऱ्या व कष्टकरी महिलांना जर कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले तर त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतील, अशी अपेक्षा संध्याराणी बेडगे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना व्यक्त केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी रमेश चौगुले राजेश्वरी भोपे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अनेक महिलांनी कापडी पिशवी चे प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
Leave a Reply