
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने जानेवारी 2011 ते ऑगस्ट 2012 या कालावधीतील कर्मचार्यांची भविष्य निधीची 4 कोटी 93 लाख 76 हजार 963 रुपये इतकी रक्कम थकवली होती. या प्रकरणी भविष्य निधी कार्यालयाने महापालिकेची बँक खाती सील केली होती. या विरोधात महापालिकेनं केंद्रीय औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. औद्योगिक न्यायालयानं महानगरपालिकेलाथकीत रक्कमेपैकी 40 टक्के म्हणजे 1 कोटी 97 लाख इतकी रक्कम 17 नोव्हेंबर 2019 पूर्वी भविष्य निधी आयुक्तांकडं जमा करण्याचे आदेश दिले होते. परंतु महापालिकेनं ही रक्कम मुदतीत भरली नसल्यानं महापालिकेची आय. डी. बी. आय बँकेच्या शिवाजी चौक आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या फोर्ड कॉर्नर शाखेतील खाती सील करण्यात आली असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
ज्या संस्थांना कर्मचारी भविष्य निधी कायदा लागू आहे त्या संस्थांनी प्रत्येक महिन्याला क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त कार्यालयाकडं कर्मचा-यांची रक्कम जमा करावी असं आवाहन आयुक्त सौरभ प्रसाद यांनी केलंय. पत्रकार बैठकीला सहाय्यक भविष्य निधी आयुक्त एम. डी. पाटगावकर उपस्थित होते.
Leave a Reply