
महापूर आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केलेले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 54 लाख हेक्टर सुपीक जमिनीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले.
कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील उभी पिके आणि घरेदारे पुरामध्ये बुडले. आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील जी काही थोडीबहुत पिके उभी होती आणि काढणीला आली होती त्यांचं ही नुकसान केले.नुकसानभरपाई साठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे निधी मागणी केली होती, त्यात महापूर नुकसभरपाई करीता 6813 कोटी आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई करीता 7207 कोटी रुपयांची मागणी केली होती. गेल्या तीन महिन्यांत शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचा लाभ पोचवला गेला नाही. ‘पंचनामे’कारण्याच्या नावाखाली सामान्य शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. संकटग्रस्त शेतकाऱ्यांविषयी जराही सहानुभूती नसलेल्या या खाजगी विमा कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.सरकारने या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून गेलेल्या शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ यायच्या आत मदत पोचवावी. रब्बी च्या पेरणीकरिता शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही याची दखल घ्यावी असे निदर्शनास आणून देत खाजगी विमा कंपन्यांच्या लुटी विरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संसदेत आवाज उठवला.
Leave a Reply