
कोल्हापूर : शहरातील मंजूर रस्ते व डांबरी पॅचवर्कच्या कामाची आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. पूरामुळे व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळ महापालिकेच्या वतीने दैनंदिन होणारी पॅचवर्कची कामे, नव्याने सुरु असलेल्या स्वतः उपस्थित राहून जातीने कामाचा आढावा आयुक्त घेत आहेत. आयुक्तांनी पितळी गणपती ते आर.टी.ओ. ऑफिस व विवेकानंद कॉलेज रोड या रस्त्यास भेट देऊन या ठिकाणी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी संबंधीत ठेकेदार यांना रस्ते दर्जेदार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. आज शहरामध्ये माऊली चौक, शाहुपूरी, जरगनगर रोड, अजिंक्य तारा चौक ते विवेकानंद कॉलेज, केशवराव भोसले नाटयगृह रोड या परिसरात पॅचवर्कची कामे करण्यात आली आहेत. यावेळी शहर अभियंता हर्षजीत घाटगे, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे उपस्थित होते.
Leave a Reply