
गेल्या महिनाभर महाराष्ट्रात झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेण्यासाठी शिवाजी पार्क येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. याआधी किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तिनही पक्ष्यांचे किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले. आणि हे सरकार फक्त जनतेच्या विकासासाठी असणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले. पण शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा भगवा म्हणून आज पर्यंत ओळख असणाऱ्या शिवसेनेने या किमान समान कार्यक्रमात धर्मनिरपेक्षतेची ग्वाही दिली. हिंदुत्व हा मुद्दा बाजूला ठेवत किमान समान कार्यक्रमात धर्मनिरपेक्ष हा शब्द आवर्जून लिहिला गेला आहे. महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले. पण हा भगवा धर्मनिरपेक्ष असणार आहे हे आता सिद्ध झाले आहे.
Leave a Reply