शेतक-यांना आर्थिक स्थैर्य देणारी राष्ट्रीय कृषि विमा योजना यापुढेही सुरु

 

 

कोल्हापूर: राष्ट्रीय कृषि विमा योजना रब्बी हंगाम 1999-2000 पासुन राज्यात सुरू केली आहे. रब्बी हंगाम 2015-16 साठीही योजना पुढे सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिलेली असून; यामध्ये गहू (बागायत), गहू (जिरायत), रब्बी ज्वारी (बागायत), रब्बी ज्वारी (जिरायत) हरभरा, करडई, सुर्यफुल, व रब्बी कांदा, तसेच उन्हाळी भुईमुग, व भात या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. असे कोल्हापूरच्या विभागीय कृषि सहसंचालकांनी कळविले आहे.नैसर्गिक आपत्ती पूर, अतिवृष्टि, गारपीट, चक्रिवादळ, अपुरा पाऊस किडरोग प्रादुर्भाव इत्यादी मुळे शेती पीकांचे नुकसान झाल्यास, शेतक-यांना झालेल्या पीक नुकसानीच्या प्रमाणात अर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. निरनिराळ्या पिकांसाठी विमा हप्ता दर वेगवेगळे असून; सर्वसाधारण विमा संरक्षण 100 टक्के व जास्तीत जास्त अतिरिक्त विमा संरक्षण 150 टक्केपर्यंत विमा संरक्षण घेता येते.विमा संरक्षण घेणा-या अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना देय विमा हप्त्यामध्ये 10 टक्के अनुदान कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयांत चालू रब्बी हंगामात आतापर्यंत अनुक्रमे 96, 132 व 6 हजार हेक्टर अशी एकूण 234 हजार क्षेत्रावर रब्बी पीकांची पेरणी झालेली आहे. राज्यातील बहुतांशी शेती ही कोरडवाहू आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी किफायतशीर शेती करु शकत नाहीत, पिकांच्या उत्पन्नात घट येवू शकते अशा परिस्थितीत शेतक-यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय कृषि विमा योजना, पीक निहाय अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ, मंडळ गट किंवा तालुका, तालुका गट स्तरावर राबविण्यात येत आहे.  या योजनेमध्ये शेतक-यांना सहभागी होण्याची अंतीम मुदत पीक पेरणी पासून 1 महिना किंवा 31 डिसेबर 2015 या पैकी जी आधी असेल ती, तसेच उन्हाळी भात व भुईमूग पीकासाठी पेरणी पासून 1 महिना किंवा 31 मार्च 2016 या पैकी जी आधी असेल ती, अशी अंतिम मुदत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांसाठी योजनेमधील ऐच्छिक सहभाग आणि सरासरी उत्पन्न व किमान आधारभूत किंमत यांचेशी निगडीत विमा संरक्षित रक्कम ही या योजनेची ठळक वैशिष्टये  म्हणता येतील. योजनेमध्ये कुळांसह कोणतेही शेतकरी सहभागी होऊ शकतात.  विमा प्रस्ताव व ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या विमा संरक्षित पिकाच्या क्षेत्राच्या नोंदीसह 7/12 उतारा व खातेदार उतारा (8 अ) घेउन आपले खाते असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपला विमा हप्ता भरावा. जर क्षेत्राचा 7/12 उतारा उपलब्ध नसेल तर पिक पे-याचा गावकामगार तलाठी / कृषि सहाय्यक यांचा दाखला विमा प्रस्तावासह सादर करावा. पिक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहायक, कृषिसेवक कृषि पर्यवेक्षक तसेच संबधीत मंडल कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी ,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, किंवा राष्ट्रीयकृत बॅंक अथवा नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बॅकेशी संपर्क साधावा.पिकांच्या नुकसानीची जोखीम विम्याच्या माध्यमातून उचलून शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे कार्य या योजनेतून होत असल्याने जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूरच्या विभागीय कृषि सहसंचालकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!