
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-2015 ची प्रक्रिया दिनांक 28 सप्टेंबर 2015 पासून सुरु झाली असून दिनांक 01 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीचे कामी 81 प्रभागांची 07 क्षेत्रीय कार्यालयानुसार विभागणी करण्यात आलेली आहे. एकूण 81 प्रभागामधून 506 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानाकरिता 81 प्रभागामधून 378 मतदान केंद्रे निश्चीत करणेत आलेली आहे. त्याप्रमाणे निवडणूकीची सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे.
उमेदवारांना निवडणूक प्रचाराचा कालावधी उदया शुक्रवार, दि.30 ऑक्टोंबर 2015 रोजी सायं.5.30 वाजता संपत आहे. तरी सर्व उमेदवार व राजकीय पक्ष/आघाडया यांनी सायं.5.30 नंतर कोणतीही सभा, रॅली, पदयात्रा अथवा इतर कोणत्याही प्रकारे प्रचार करु नये. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन निवडणूक अधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.
तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने, अस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाटयगृह, औद्योगिक उपक्रम किंवा इतर अस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स्, रिटेलर्स इत्यादी अस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी द्यावी असे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग व ऊर्जा व कामगार विभाग यांनी परिपत्रकाने महानगरपालिकेस कळविले आहे. तरी मतदाना दिवशी महापालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना यांनी शहरातील मतदारांना सुट्टी देणेत यावी असे महापालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Leave a Reply