
कोल्हापूर : टोप संभापुर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील 14 वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्व गोंधळी याने 245 किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या 10 तासात पूर्ण केले आहे.वयाच्या सातव्या वर्षापासून अथर्व हा सायकल व अन्य खेळाचे धडे त्याची आई ,वडील व शालेय शिक्षकांकडून घेतले आहेत .अथर्व गोंधळीने ३० नोव्हेम्बर रोजी 296 किलोमीटरचे अंतर 12 तासात पूर्ण करून सायकलिंग मध्ये जागतिक विक्रम केला होता. त्याच्या या कामगिरीची दखल घेत द डायसेस ऑफ आशिया चेन्नई तामिळनाडू यांनी डॉक्टरेट इन अँथलेटिक ही पदवी चेन्नई येथे एफ एफ डब्ल्यू चे संचालक डॉ. चिझुको ऑन डेरा आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. पी.एम. इबेंन्जर यांच्या हस्ते देण्यात आली.याचवेळी त्याची कलाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनीही नोंद घेत त्यांचे रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले. तसेच त्याला रायझिंग स्टार ही पदवी बहाल करण्यात आली व त्यास बेस्ट अँचिव्हर ऑफ द इयर 2019 हे पारितोषिकही देण्यात आले.
इतक्या लहान वयात स्पोर्टस मध्ये डॉक्टरेट इन अँथलेटिक ही पदवी मिळविणारा अथर्व हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.अथर्वने लहानपणापासूनच विविध खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळविले आहे. 2018 मध्ये त्याने पाच सुवर्णपदके आणि तीन रौप्य पदक तायक्वांदोमध्ये पटकाविले आहेत.२०१९ मध्ये त्याने विविध तायक्वांदो,कुडो,सायकलिंग,ट्रॅयथॉन, अशा खेळांमध्ये २२ पारितोषिक मिळविली आहेत. अथर्व हा तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट १२ व्या वर्षी झाला आहे.
पेठवडगाव येथील होली मदर इंग्रजी माध्यम शाळेत शिकणारा अथर्व दररोज 170 किलोमीटर सायकल सराव करत आहे.३० नोव्हेम्बर २०१९ रोजी त्याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन रेकॉर्ड,एशिया पॅसिफिक रेकॉर्ड पूर्ण केले तर लॉगेस्ट सायकलिंग रेकॉर्ड मध्ये त्याने 12 तासात 240 चे अंतर पूर्ण करायचे होते ते त्याने 296 किलोमीटर अंतर पूर्ण केले यासाठी त्याला नॅशनल रेकॉर्ड व चिर्ल्डन रेकॉर्ड पारितोषिक देण्यात आली यातही त्याला ६ पारितोषिक देण्यात आली.आतापर्यत त्याची ७ जागतिक विक्रमात नोंद झाली आहे.त्याने कोल्हापूरचे नाव उंचावले आहे त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Leave a Reply