
कोल्हापूर/ प्रतिनिधी: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उलथापालथ होत सत्तेचा पलटवार झाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला त्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही हाच फॉर्म्युला लागू पडला. आणि महाविकास आघाडीचे गगन बावड्याचे सदस्य बजरंग ज्ञानू पाटील यांना ४१ मते पडल्याने ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मतमोजणी दरम्यान राष्ट्रवादीचे जीवन पाटील गैरहजर राहिले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील यांना ४१ मते तर भाजपचे उमेदवार अरुण इंगवले यांना २४ मते मिळाली. उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील यांची निवड करण्यात आली.मतांचे पक्षीय बलाबल असे; कॉग्रेस -१४,राष्ट्रवादी -१०,शिवसेना -१०,शेतकरी संघटना -०२,शाहू आघाडी _ ०२,अपक्ष -०१,चंदगड विकास आघाडी- ०१,ताराराणी आघाडी – ०१,एकूण -४१.
भाजप आघाडी;भाजप -१३,आवाडे गट -०२,चंदगड युवक क्रांती आघाडी- ०१,जनसुराज्य – ०६,ताराराणी आघाडी ०२,एकूण -२४
भाजपच्या विजय भोजेनी मतदान केले नाही.
अश्या प्रकारे भाजप बरोबरच महाडिक गटाचाही पराभव करून महाविकास आघाडीने आघाडी घेतली.पुन्हा तीन वर्षांनी जिल्हा परिषदेवर काँग्रेस राष्ट्रवादी चा झेंडा फडकला.
Leave a Reply