
कोल्हापूर :पुणे येथे मिनीफुटबाँल असोसिएशन आँफ इंडिया यांच्या वतीने आयोजित सबजुनियर अंडर 14 वर्षे मिनीफुटबाँल नॅशनल चॅम्पियनशिप 2020 स्पर्धा दिनांक 10 जानेवारी 2020 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत पुणे येथे सदर मिनीफुटबाँल स्पर्धा पार पडली.कोल्हापूरच्या रिवा एफ सी क्लब मधून 12 खेळाडूंची निवड चाचणी होऊन दिव दमन राज्याचा प्रतिनिधी संघ म्हणून या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत एकूण 14 राज्य संघ सहभागी झाले होते.सदर संघाने पहिला सामना बेंगलोर विरुद्ध 4-1,
दुसरा सामना पंजाब विरुद्ध 6-2,
तिसरा सामना गुजरात विरुद्ध 1-0,
आणि क्वार्टर फायनल सामना महाराष्ट्र विरुद्ध 1-0,
सेमीफायनल सामना दादरा नगर हवेली विरूद्ध 3-1 ने जिकून अंतिम फेरीत कर्नाटक विरुद्ध 4-0 एकतर्फी जिंकून स्पर्धेवर वर्चस्व मिळवून अजिंक्यपद पटकावले.या स्पर्धेत बेस्ट प्लेयर आँफ द टुर्नामेंट हे पारितोषिक संघाचा खेळाडू रक्षित राहूल दुधाने याला देण्यात आले.या संघाकडून रक्षित दुधाने (कॅप्टन) सोहम खामकर (गोलकीपर) जैद शेख, ऋषिकेश कुलकर्णी,मुस्तफा फरास, साद शेख, आदित्य कल्लोळी, आयुष पाटील, हुजेफा मोमीन, हर्षवर्धन माळी, सिद्धेश पंदारे, नील देसाई या खेळाडूंनी सहभाग घेतला।
संघाचे प्रशिक्षक कमलेश माराडीया यांच्या नेतृत्वाखाली संघाने अजिंक्यपद पटकावले.या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड चाचणी होणार असून तो संघ स्पेन (बार्सिलोना) येथे होणार्या मिनीफुटबाँल स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.
Leave a Reply