
कोल्हापूर: केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या 25 डिसेंबर या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथे संघर्ष दिन साजरा करण्यात आला. यावेळी बहुजन रत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संघर्षमय कर्तुत्वाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंना बेस्ट अँथलेट अवॉर्ड 2019 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये कोल्हापूर मधील टोप येथील विश्वविक्रमवीर डॉ अथर्व गोंधळी याला बेस्ट अँथलेट ऑफ द इयर 2019 या पुरस्काराने गौरविण्यात आले.या पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण सभागृह कराड येथे बहुजन रत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष महेंद्र शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तर सचिव अनिल माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या सोहळ्याचे आयोजन आरबी स्पोर्ट्स मॅनेजमेंट व अनिल माळवी प्रतिष्ठान यांच्यातर्फे करण्यात आले होते.त्यास निखिल माळी,गणेश देसाई, वैभव माळी, यश पाटील, डॉ.स्मिता गिरी यांचे सहकार्य लाभले. डॉ.अथर्वने लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळवले आहे. आत्तापर्यंत त्याने 21 सुवर्णपदके 12 रौप्य पदके व 6 कास्य पदके मिळविली आहेत. 2019 मध्ये ताय क्वांनदो,कुडो,सायकलिंग, ट्रायलिथॉन अशा विविध खेळांमध्ये त्यांने 23 पारितोषिके पटकावली आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी अथर्वने ब्लॅक बेल्ट मिळविला आहे 30 नोव्हेंबर 2019 रोजी बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून त्याने विश्वविक्रम केला आहे याची दखल घेऊन रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्यावतीने त्याला गौरविण्यात आले आहे.
Leave a Reply