लुपिन चा आदर्श घेत आजचे मदत घेणारे पुरग्रस्त निलेवाडीकर भविष्यात मदत देणारे होतील: पु,अदृश्यकाडसिध्देश्वर स्वामी

 

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात महापुराची सर्वाधिक झळ बसलेल्या हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीकर आज जरी पुरग्रस्त म्हणून विविध वस्तू रूपात मदत स्विकारत असले तरीही भविष्यात मात्र ते नक्कीच आपल्या संघर्षमयवृत्तीने मदत देणारे होतील.असा विश्वास सिद्धगीरी कणेरीमठाचे प. पू .अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला. त्याच्या प्रमुख उपस्थितीत दर्बल घटक सबलीकरण आणि आपतकालीन पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत लुपिन फौडेशनच्यावतीने मंगळवारी दि. २१ जानेवारी रोजी पुनरूत्थानकार्य लोकार्पन सोहळा संपन्न झाला.यावेळी खा . धैर्यशिल माने, आ .विनय कोर, लुपिनचे कार्यकारी संचालक सिताराम गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सर्वांचे स्वागत अॅड .प्रमोद शिंदे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात लुपिन फौंडेशनचे कार्यकारी संचालक सीताराम गुप्ता यांनी गेली तीन महिने प्रत्यक्ष पुरात आणि त्यानंतर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून लुपिनने या निलेवाडी गावातील १२ पुरग्रस्त कुटुंबियांना नवीन घरे , सुपूर्तीसह अंगणवाडी – जिल्हा परिषद शाळा नूतनीकरण , गावाचा पार उभारणे , पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नूतणीकरण , २६ कुटुंबियांना व्यावसायिक उभारणीसाठी मदत अपंग कुटुंबाना विशेष मदत, औषधे वाटप यासह विविध १२ सेवांची परिपूर्ती केली आहे . भविष्यात ही विविध कामातून हा सामाजिक बांधीलकीचा ऋणानुबंध अधिक घट्ट केला जाईल , असे अभिवचन दिले . यावेळी बोलताना खा . धेर्यशिल माने यांनी निलेवाडीकराशी माझ्या आई आणि आजोबांपासून ते माझ्यापर्यंतच्या तिसऱ्या पिढीतही खासदारपदाच्या विजयात आघाडीच्या मतासह स्नेहबंध कायम आहे . सर्वाधिक झळ पोहचलेले निलेवाडीकर भविष्यात आपल्या कुटुंबातील एक घटक म्हणून जीव धोक्यात घालून आपल्या जनावरानाही सांभाळणार म्हणून ओळखले जातील . भविष्यात ज्यादा पुराची झळ बसू नये यासाठी आपतकालिन नियोजनाचे प्रशिक्षण प्रत्येक निलेवाडीकरांनी घ्यावे तसेच रस्तेही पक्के करावेत यासाठी आपली आग्रही विनंती आहे , असे त्यांनी नमूद केले .वारणा सहकार आणि उद्योग परिवाराशी निलेवाडीकरांचा पिढ्यापिढ्या जबाबदार कुटुंब घटक म्हणून नेहमीच सहभाग राहिला आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील लपिनने सामाजिक बांधीलकीतन जपलेला ऋणानुबंध भविष्यात दलक्षित धनगरी वाडी वस्तीपर्यंतही पोहचावा अशी अपेक्षा आ . विनय कोरे यांनी व्यक्त केली . पुणे विभागीय लुपिनचे योगेश प्रभू यांच्यासह अमृता जाधव या विद्यार्थीनीने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले . या उपक्रमास सदस्या सौ. पुष्पा आळतेकर, कृषी महाविद्यालय पुण्याचे डॉ. आर . डी .घाटगे, विशाल महापुरे , श्रीमती सरितादेवी मोहिते , सुलोचना देशमु , सरपंच वर्षा सुभाष माने , उपसरपंच तानाजी जाधव , ग्रामविकास अधिकारी पी. एन. पाटील, लुपिन फौंडेशनचे व्यंकटेश शेटे , विकास जाधव यांच्यासह ग्रामस्त उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!