
कोल्हापूर: 3 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सुशोभित कठड्याला मोठा ट्रक धडकला होता ,त्यावेळी पोलीस प्रशासन ,महापालिका अधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटना यांची बैठक झाली होती.
सदर बैठकीत
1) छत्रपती शिवाजी महाराज चौक कडे येणारी अवजड वाहतूक बंद करणे.
2) सुशोभित परीसरभोवती संरक्षक दगड बसविणे.
3)रस्त्यावर रिफ्लेक्टर बसविणे.
4)छत्रपती शिवाजी महाराज चौकातील KMT बस स्टॉप हलविणे.
5)सभोवतालचे अतिक्रमण हटविणे.
6)CCTV वाढविणे.यातील फक्त अवजड वाहतूक बंदचा आदेश लागू करण्यात आला पण त्याची अंमलबजावणी काही दिवसच झाली पुन्हा मोठ्याप्रमाणावर अवजड वाहतूक चालू झाली असल्यामुळे त्यातूनच पुन्हा 4 अपघात झाला आहे.प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जर छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही अघटीत घडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .त्यावर लक्ष वेधण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 यावेळेत छत्रपती शिवाजी चौकात महाराजांसमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे महेश उरसाल ,हर्षल पाटील ,प्रसाद मोहिते ,संदीप पाटील ,सूरज सुलताने ,अनिरुद्ध कोल्हापुरे , अमित माळी ,योगेश देसाई ,निखिल माळकर ,रणजित आयारेकर , ऍड. रणदिवे , सोनार ,गणेश लाड ,अर्जुन गोसावी ,दिग्विजय लोहार ,विकी मोहिते, राजेंद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Leave a Reply