वकिलाने केली आपल्या अशिलाची 1 कोटी 15 लाखांची फसवणूक ; लोकांनी सावध राहण्याचे केले आवाहन

 

कोल्हापूर : कौटुंबिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन आमच्या परिवाराचेच एकेकाळी वकील असलेल्या ॲड. श्रीकांत नायक यांनी सौरभ नोरलीकर, शर्मिला नोरलीकर व परिवाराच्या मदतीने माझी स्थावर मालमत्ता खरेदी व्यवहारात एक कोटी 15 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या विरोधात सन 2012 ला न्यायालयात दाद मागितली आहे. यांचे विरोधात फोंडा- गोवा पोलिसात गुन्हा नोंद आहे. न्याय मागण्यासाठी सामान्य जनतेचे आश्वासन असणाऱ्या वकिलांनीच आपल्या अशीलाची फसवणूक केल्याने आपण महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन व इंडियन बार असोसिएशनकडे ॲड. श्रीकांत नाईक यांच्या विरोधात दाद मागितली असून त्यांची सनद रद्द व्हावी अशी मागणी केली आहे. अशी माहिती व्यावसायिक मुन्नालाल हलवाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते पुढे म्हणाले,आमचे विश्वासु असलेल्या ॲड. श्रीकांत नायक यांनी नोरलीकर परिवाराकडेच फोंडा मधील हिंदुस्थान पेट्रोलियमचा पेट्रोल पंप व जागा ही नोरलीकर हाऊस ऑफ पेट्रोलियम नावाने असल्याचे सांगून ही स्थावर मालमत्ता मला विकत घेण्यास भाग पाडले. त्यासाठी टप्प्याटप्प्याने रोख व चेकने मी 1कोटी 15 लाखाची रक्कम दिली. मात्र पुढील व्यवहार करताना सदर जागा व पंप यांच्या मालकी संदर्भाने खटला सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे मी पैशाची परत मागणी करता मला मानसिक त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली. यामध्ये नोरलीकर कुटुंबियांनी, ॲड.नाईक यांनी माझी जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहे. त्यामुळेच न्याय व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या वकिलानेच केलेल्या फसवणुकी विरोधात मी दाद मागत आहे. ही वस्तुस्थिती अधिकाधिक जिल्हा स्थानी जाऊन सांगण्याचा व आर्थिक स्थावर व्यवहार अधिक दक्षतेने करून सामान्य जनतेने आपली होणारी फसवणूक टाळावी. यासाठीच हा माझा प्रबोधनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांची साथ मिळावी. असे आवाहनही मुन्ना हलवाई यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!