देशासाठी बलिदान देणाऱ्या सैन्यदलातील सैनिकांचा सन्मान कायम राखावा: आ.चंद्रकांत जाधव

 

कोल्हापूर / प्रतिनिधी : फाउंडेशनच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाषाही जवानांच्या कुटुंबीयांच्या सत्कार करण्यात आला भारत मातेचे रक्षण करताना वीरमरण पत्करलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सत्कार या वेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना आम.चंद्रकांत जाधव यांनी बोलताना उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक तरुणाने आरोग्य सुदृढ राखावे तसेच देशप्रेमासाठी बलिदान देणाऱ्या सैन्यदलातील सैनिकांचा सन्मान कायम राखावा असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायक कबीर आणि त्यांच्या सहकारी कलाकाराने संदेसे आते है,ये मेरे वतन के लोगो,’तेरी मिटी आधी देशभक्तीपर गीते सादर केली. त्यानंतर कार्यक्रमात उपस्थित अधिकारी यांचे औक्षण करण्यात आले. कोल्हापूर शहरावर ओढवलेल्या महापुराच्या संकटात लोकांना मदत केलेल्या एनसीसी कैडेट्सचा सत्कार ले.कर्नल सरनाईक,उत्पल शहा,आकाश कोरगावकर, डॉ. चेतन चव्हाण,राज कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे आर.बी.डोगरा ,ले.कर्नल नायक,ले.कर्नल सरनाईक व आम.चंद्रकांत जाधव व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना फेथ फौंडेशनचे संस्थापक राज कोरगावकर यांनी या फेथच्या कार्याचा आणि आजपर्यंत झालेल्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच सर्वांनी आदर बाळगला पाहिजे अशी भूमिका मांडली.यावेळी सात वर्षाच्या वयात डॉकटरेट मिळविलेल्या केदार साळुंखे याचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना ब्रिगेडियर आर.बी.डोगरा यांनी सैन्य दल,त्यांचा त्याग बलिदान याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच मारणे हे आमचे काम नसून देशातील नागरिकांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगितले. तसेच फेथ फाउंडेशन सारख्या युवकांच्या एनजीओ मार्फत आशा प्रकारचे सैन्य दलाविषयी आदर व्यक्त करणारे उपक्रम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी सायबर महाविद्यालय एमएसडब्ल्यू विभागाचे श्री भोसले व विद्यार्थी एनसीसी कडेट्स यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन भारत प्रभुखोत यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन राज कोरगावकर,श्रेयस नंदिकर, रजत जाधव, समृद्धी दळवाई, गणेश नलावडे, तेजस सावंत, मोईज भोरी, ओम कोरगावकर, रोहित तांदूळवाडकर,अंकित आळवेकर, तोफिक मीर शिकारी व फेथ सदस्यांनी केले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर फौंडेशनचे विविध शाखांचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!