
कोल्हापूर /प्रतिनिधी : पर्यावरण वाचवा संदेश देत टोप संभापुर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील चौदा वर्षीय नववीत शिकणाऱ्या विश्वविक्रमवीर डॉ अथर्व गोंधळीने 296 किलोमीटरचे अंतर 12 तासात पूर्ण करून सायकलिंग मध्ये जागतिक विक्रम केला होता यामध्ये त्याची ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड,एशिया पॅसिफिक रेकॉर्ड आणि नॅशनल रेकॉर्ड असे 6 विक्रमाची नोंद झाली होती.या विक्रमाची नोंद आता हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुमन पल्ले यांनी त्यास लॉगेस्ट सायकलिंग एक्सपेडिशन आणि फास्टेस्ट सायकलिंग मेरेथॉन अशी दोन प्रशस्तीपत्र दिले आहेत डॉ अथर्वने लॉगेस्ट सायकलिंग एक्सपेडिशन 296 किमीचे अंतर 12 तासात पूर्ण केले आहे व फास्टेस्ट सायकलिंग मेरेथॉन 42.195 किमीचे अंतर 78 मिनिट 57 सेकंदात पूर्ण केले होते. याची नोंद ही हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.ही दोन प्रशस्तीपत्र डॉ.अथर्व यास पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी बोलताना देशमुख यांनी डॉ.अथर्व याचे कौतुक केले व त्यास भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी कोरगावकर ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर, डॉ. संदीप गोंधळी,डॉ. मनीषा गोंधळी,ईशा गोंधळी आदी उपस्थित होते.
विश्वविक्रमवीर डॉ अथर्व गोंधळी याच्या सायकलिंग मधील विश्व विक्रमाची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अलवारीस यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 च्या ब्रँड अँबँसिडर म्हणून निवड केली होती.त्यानेही इंधन बचाव,बेटी बचाव,बेटी पढाओ,पर्यावरण वाचवा,रोड सेफ्टी असे संदेश दिले.त्याचेही अलवारीस यांनी कौतुक केले.त्याच्या या विक्रमाची नोंद सर्वदूर पोहोचली आहे.डॉ. अथर्व वयाच्या सातव्या वर्षापासून सायकल व अन्य खेळाचे धडे त्याची आई ,वडील व शालेय शिक्षकांकडून घेत आलेला आहे. लहानपणापासूनच खूप जिद्दी आणि मेहनती असलेला हा डॉ.अथर्व वयाच्या बाराव्या वर्षी सहावीत असताना मध्ये ब्लॅक बेल्ट झाला आहे.सध्या त्याचे प्रशिक्षक हे आयर्नमॅन आकाश कोरगावकर हे आहेत.लहानपणापासूनच विविध खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश तसेच ताय क्वांनदोमध्ये त्याने घवघवीत यश मिळविले आहे .तो दररोज 170 किलोमीटर प्रवास आपल्या सायकल वरून करत आहे.हा सायकलचा प्रवास करत असताना तो शरीर तंदुरुस्त ठेवा, निरोगी रहा, प्रदूषण टाळा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, असा संदेश देत आहे.
Leave a Reply