
कोल्हापूर /प्रतिनिधी : विकासाच्या कामात राजकारण आणू नये आपण आता माझे जरी असलो आपण कामे खूप केली आहेत म्हणून माझे झालो आहोत येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत दिल्लीमध्ये तुम्हीच असणार असा विश्वास भाजप राज्यप्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला कोल्हापूरमध्ये मेरी वेदर मैदान येथे भीमा कृषी व पशु प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार महादेवराव महाडिक , भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक,माजी आमदार अमल महाडिक, गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे, बाबा देसाई, सौ.अरुणंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक,भाजप जिल्हा अध्यक्ष राहूल चिकोडे,भगवान काटे,माजी आमदार भरमूआण्णा पाटील भाजपचे महानगरपालिका विरोधी गटनेते विजय सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
भाजपचे राज्य प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी बोलताना माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरचे माजी खासदार अशी आपली ओळख पुसली जाणार आहे धनंजय महाडिक 2024 ला नक्कीच संसदेत असतील हे कुठल्या ज्योतीशांनी सांगायची गरज नाही.धनंजय महाडिक यांच्या मुळे पक्षाला बँनर मिळाले आहे २०२४ला माजी पद जाणार आणि तुम्हीच संसदेत जाणार तुमच्या माध्यमातून संसदेत कोल्हापूरचा आवाज घुमणार आहे असे सांगितले व भीमा कृषी प्रदर्शन हे शेतकरी याना उपयुक्त असल्याचे सांगून कोल्हापूर चे शेतकरी ब्रँड आंबसिडर असल्याचेही सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक व आतल्या माणसापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि शेती ही विज्ञान संशोधनाच्या फायदे निगडित करावी या भूमिकेतून हे प्रदर्शन आयोजित केले आहे चंदगडच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्याला विज्ञानाची माहिती व्हावी महाराष्ट्रात आणि कृषी प्रदर्शन झाली वसंतराव नाईक यांनी केलं होतं यशवंतराव चव्हाण यांनी केलं. आता धनंजय महाडिक करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पुराने विळखा घातला शेतकऱ्यांना मदत मिळाली मात्र आता मदत मिळात नाही असे सांगितले.आधुनिक शेती, योजना एका ठिकाणी मिळावी. शेतकरी प्रगत झाला तर राष्ट्र प्रगत होईल असे सांगितले.
या प्रदर्शनात शेती व कृषी विषयक ४०० स्टाँल ,दररोज नवीन तंत्रज्ञान वर चर्चासत्र होणार आहेत.याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे धनंजय महाडिक यांनीआवाहन केले.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळचे महत्त्व बऱ्याच जणांना कळत नाही देशात गोकुळचे नाव आहे. एवढ चांगल काम १३ वर्ष सुरू पण जिल्ह्यातील लोक विरोध करतात. नवीन आमदार झाले. ते उद्योजक आहेत. त्यांनी राजकारनात पडू नये, मंडपाचे काम बंद पाडण्यासाठी काम त्यांनी यायचे कारण नव्हते त्यांचा रीमोट कंट्रोल बावड्यात आहे. उद्योगजकांचे प्रश्न आहेत त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे आमदार साहेब आमची लोक तुमच्या कार्यक्रमात घुसले तर पळता भूई थोडी होईल असा इशारा दिला. पुन्हा आम्ही सत्तेत आलो की झेपणार नाही असा इशारा केला. राजकारण विरहित कार्यक्रम आहे जय पराजय होतो पराभूत झालो म्हणून दाढी वाढवून अज्ञातवासात गेलो नाही.टीव्ही मोबाईल फोडले नाही.कोण कधी संपत नाही असा टोला दिला.सर्व कार्यक्रम स्वतः करतो गोकुळचा एक रुपया नाही असेही ठणकावून संगितले.जिजामाता कृषी भूषण पुरस्कार सौ.अरुणंधती महाडिक यांच्या हस्ते रुपाली अभयसिंह पाटील, सुरेख सुरेश शेगुंशी,अनिता बाजीराव चौगले,राणी सचिन पाटील याना देण्यात आले.भीमा शेतीभूषण पुरस्कार बाबासो भिकाजी किल्लेदार,बळीराम पंडित व्हरांबळे,शिवाजी गणपती जोशी, विठ्ठल गणपती पाटील,निळकंठ रामा वाळवेकर, डॉ. मोहन शंकरराव जाधव,डॉ. गंगाधर पाटील, आदींना देण्यात आले.
Leave a Reply