राज्यस्तरीय महिला दिनाची तयारी पुर्ण: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

कोल्हापूर : राज्यस्तरीय महिला दिनाची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता आणि खबरदारी घेवून उद्या कोल्हापूरात महिला दिन उर्त्स्फुतपणे साजरा होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमास सुमारे 40 ते 50 हजार महिला उपस्थित राहतील असेही ते म्हणाले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ आणि जिल्हा परिषदेच्यावतीने येथील तपोवन मैदानावर उद्या रविवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत राज्यस्तरीय महिला दिन आयोजित केला आहे. या राज्यस्तरीय महिला दिन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील,महिला व बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती स्वाती सासणे,मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह विषय समित्यांचे सभापती आणि सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.महिला दिनानिमित्त मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार असल्याने सर्व व्यवस्था चोखपणे पार पाडाव्यात यामध्ये मंडप, प्रवेशव्दार, बैठक व्यवस्था, पार्किंग, पिण्याचे पाणी, फुड पॅकेट, फिरती शौचालये, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, वैद्यकीय पथके, स्टॉल मांडणी आदि व्यवस्था चोखपणे करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर कोरोना विषयी अधिक दक्षता आणि खबरदारी घेण्यास प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट करुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या महिला मेळाव्यासाठी चार वैद्यकीय पथके तैनात केली असून 108 क्रमांकांच्या पुरेशा गाड्या उपलब्ध केल्या आहेत. धुळ व उन्हाचा महिलांना त्रास होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली असून महिलांच्या तपासणीचीही खास व्यवस्था केली आहे. महिलानां सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप जाणवू लागल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांना समावून घेणारा व सर्वाना समान न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असून 2 लाखावरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी 2 लाखावरील रक्कम भरल्यास 2 लाखाच्या कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या नुकसान भरपाईचा 168 कोटीचा तर 2 लाखाप्रमाणे कर्ज माफीचा 85 कोटीचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झाला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेकडील अनुकंपा तत्वावरील 9 उमेदवारांना नियुक्तीचे आदेशही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!