
१८व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशियाई महिला दिग्दर्शकांच्या सिनेमांच्या स्पर्धेत शिल्पा शुक्ला दिग्दर्शित स्टोरीज @८ या सिंगापूरच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले.लघुपटांच्या स्पर्धेत इराणच्या आय एम नॉट माय बॉडी या निमा अकबरपौर दिग्दर्शित लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले तर अविष्कार भारद्वाज दिग्दर्शित विठा या मराठी लघुपटाला द्वितीय पारितोषिक मिळाले.तृतीय पारितोषिक कंकणा चक्रवर्ती दिग्दर्शित बंगाली लघुपट ‘रिटन बाय ?’ आणि वहीद अल्वांडीफर दिग्दर्शित ‘कव्हर’ या इराणी चित्रपटांना विभागून देण्यात आले.इराण सांस्कृतिक केंद्राचे संचालक मा.मोहसिन अशौरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा समारोप सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी त्यानी आशियाई चित्रपटांच्या प्रसारासाठी थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा महत्वाचा वाटा असून इराणी चित्रपटांची स्वतंत्र ओळख या महोत्सवाच्या माध्यमातून झाल्याचे गौरवोउद्गार काढले. हा महोत्सव दर्दी रसिकांचा आहे असून आशियाई चित्रपटांची सघन ओळख करून देण्यात त्याचा महत्वाचा वाटा आहे,यासाठी महोत्सवाच्या पाठीशी उभे राहणारे प्रायोजक,राज्य शासन तसेच मान्यवर व्यक्ती आणि संस्था यांचे महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी आभार मानले. १ ते ६ मार्चपर्यंत चालेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये इराण, नेपाळ, चायना, कुर्दिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, कोरिया, भूतान, इस्राइल, कझाकीस्थान, श्रीलंका तसेच राष्ट्रीय सिनेमांमध्ये बंगाली, मराठी, मणिपुरी, कश्मिरी, मल्याळम, असामी, तेलगु, कन्नड, पंजाबी, हिंदी असे एकूण ४२ चित्रपट आणि २६ लघुपट दाखवण्यात आले. विशेष म्हणजे शिल्पा शुक्ला दिग्दर्शित स्टोरीज @८ या चित्रपटासाठी खास सिंगापूरहून आलेले दीडशे प्रेक्षक उपस्थित राहिले होते.यंदाच्या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य ठरली ती म्हणजे आशियाई महिला दिग्दर्शकांच्या सिनेमांची स्पर्धा, या स्पर्धेसाठी दिग्दर्शक रघुवीर कुल, स्त्री मुक्ति संघटनेच्या नेत्या छाया दातार आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक रेखा देशपांडे मान्यवर ज्यूरी म्हणून काम पाहिले.. या स्पर्धेचे परितोषिक रोख रक्कम स्वरूपाचे होते.
Leave a Reply