
कोल्हापूर(डॉ.सुभाष देसाई ):भुदरगड,राधानगरी तालुक्यात राधानगरी जवळ गावात स्टँड पासून डाव्या बाजूला थोडं वळलं की तीन चार किलोमीटरवर एक वाडी वस्ती लागते फारतर दोन हजार लोकसंख्येचे गाव पण त्या गावात “गाव करील ते राव काय करील “या म्हणीचे प्रत्यंतर येते .या गावातले 90 टक्के स्त्री-पुरुष आजूबाजूच्या गावांमध्ये मोलमजुरीसाठी जातात.एका बाजूला काळामवाडी दुसऱ्या बाजूला राधानगरी अशी दोन प्रचंड जलाशये असून सुद्धा या गावाला पाणी नाही. डोंगरातून गुरुत्वाकर्षणाने नळाचे पाणी येते. मे महिन्यात पाण्याचा ठणठणाट असतो. त्यामुळे शेती सोडा, छोटीशी बाग करणे सुद्धा मुश्किल होते. पिरळ आणि राधानगर येथून सकाळी लवकर जीप येतात, टेम्पो येतात आणि त्यातून शेतमजुरांना घेऊन जातात. गावात राहतात ती लहान मुलं ,शिक्षक आणि वयोवृद्ध जोडपी इथल्या शाळेमधल्या आधुनिक प्रयोगांमुळे इथं काही लोक येऊन भेटून जातात शाळेमध्ये आम्ही गेलो आणि या शाळेत मध्ये ध्येय वाक्य वाचले ध्यास गुणवत्तेचा .आता शेतमजुरांचा गाव आणि गुणवत्तेचा ध्यास त्यांनी घ्यावा हे ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर आक्रितच होतं. शेतमजुरांना ज्ञानाची भूक लागणं आणि आपली पुढची पिढी चांगली शिकून मोठी झाली पाहिजे अशी स्वप्न त्यांनी पाहणं हेच भारत देश जागा झाल्याचं लक्षण आहे या बाल मंदिराची कथा अतिशय अनुकरणीय आहे .भुदरगड तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी दोन प्राचार्य, एक पाटबंधारे खात्याचे डेप्युटी इंजिनिअर कॉम्प्युटर कंपोझिट ट्रेनिंग कोर्स प्राध्यापक ,एक पत्रकार ,एक निवृत्त समाज कल्याण अधिकारी अशा शाश्वत विकास चळवळीच्या लोकांनी तेथे जाऊन ग्रामसभा घेऊन चांगले काम करणाऱ्या मुख्याध्यापक ग्रामपंचायत सरपंच शिक्षक सदस्य यांना प्रोत्साहन दिले त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत असे आश्वस्त केले.बाणाची वाडीमध्ये 2017 ला ग्रामस्थांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन विषय होते. जुने खापराचे हनुमान मंदिर नव्याने बांधावे आणि त्याच वेळेला दुसरा विषय होता शाळेची दुरावस्था झालेली आहे .मग सर्वांच्या मध्ये चर्चेचा खल झाला आणि वयोवृद्ध माणसांनी सांगितले देव हाय तिथं हाय .तो कुठे जात नाही पण प्रथम आपण शाळा सुधारु तर पुढची पिढी शहाणी होईल. शेतमजूर म्हणून राहणार नाही .
या जुन्या-जाणत्या माणसांच्या सल्ल्यानुसार प्रथम शाळा सुधारण्याचे ठरले आणि तिथूनच शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटली .हे सारे सांगायला आणि मार्गदर्शन करायला कोणी आमदार, खासदार वा मंत्री या गावात आलेला नव्हता. शेत मजुरांचा स्वयंभु निर्णय होता..य मग शाळेत शिकून गेलेली विद्यार्थी त्यांची बैठक बोलावण्यात आली.
त्यांनाही शाळा सुधारण्याचे आव्हान करण्यात आले त्याच बैठकीत दीड लाख रुपये जमा झाले. ग्रामपंचायतीने ठराव केला की घरपती 500 रुपये द्यावेत .ज्या शेतमजुरांची ऐपत नव्हती त्यांना त्यातून वगळण्यात आले .काही वयोवृद्ध माणसांची मुले गावाबाहेर नोकरीसाठी गेली होती .त्यांनी सुद्धा मडक्या मध्ये लपवून ठेवलेले पाचशे रुपये आनंदाने दिले .अर्धा दिवसातच तीन-चार लाख रुपये जमा झाले .आता शाळा बांधायची म्हटल्यानंतर दगड, सिमेंट ,वाळू आली. या कामाला गावातील जे गवंडी होते ते पुढे सरसावले. त्यांनी मोफत काम सुरू केले. रात्री अकरा अकरा ,बारा पर्यंत शाळेची मुलेसुद्धा दगड-माती पुरवत होती .एकेक चिरा एक दोन ट्रक वाल्यांनी स्वखुषीने आणून शाळेला दिला. प्रत्येक माणसाचा हातभार लागला आणि मग शाळा पूर्ण झाली. 25 गुंठे मधली 12 गुंठ्यांमध्ये ही शाळा बांधलेली आहे तर बारा गुंठे मुलांना खेळण्यासाठी मैदान ठेवलेले आहे .या बारा गुंठ्यामध्ये संगणक कक्ष आहे .पूर्ण शाळेच्या क्लास रूम मध्ये व्हरांड्यात उद्बोधक चित्रे रंगवलेली आहेत. मुलांनी मुलींच्यासाठी स्वच्छ ,स्वच्छताग्रह आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि परसबाग आहे की ज्या परसबागेतून येणाऱ्या भाजी पाल्याचा उपयोग दुपारच्या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी केला जातो .या शाळेतून शिकून गेलेला एक विद्यार्थी आता पीएचडी झाला आहे .यापूर्वी इथली मुले शिक्षणासाठी बाहेर पाठवली जात पण आता बाहेरची मुले या शाळेमध्ये शिक्षणासाठी पालक पाठवू लागलेत याचा आनंद गावकर्यांना होतो. लोकसहभागातून काय काय करता येते हे मोठे उद्बोधक आहे रेशमा राजाराम पाटील सरपंच आहेत शोभा धनवडे डेप्युटी सरपंच आहेत ,नीलम डवर अध्यक्ष व्यवस्थापन समिती आहेत .या सार्या महिलांनी या कामांमध्ये पुढाकार घेतलेला आहे .या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शंकर कांनकेकर यांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे . या शाळेमध्ये फुलपाखरांची बाग आहे ,परसबाग आहे, प्लास्टिक मुक्त शाळा आहे ,तंबाखू मुक्त शाळा आहे
1955 ला सुरू झालेली शाळा चौथीपर्यंत होती 1995 पासून सातवी चा वर्ग सुरू झाला आणि आज ही श्रमदानातून उभारलेली शाळा भुदरगड राधानगरी तालुका नव्हे तर जिल्ह्यात एक आदर्श शाळा बनली आहे .नावलौकिक हळू हळू राज्यभर पसरत आहे. जर गावाने ठरवले तर काहीही अशक्य नाही भारताचे भवितव्य शेतमजूरही घडवू शकतात असा मोठा आशावाद ह्या खेड्यापासून छोट्या वाडी पासून प्रेरणा देणारा वाटला
डॉ. सुभाष देसाई
Leave a Reply