
कोल्हापूर/ प्रतिनिधी:कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जेडीजीपी असोसिएशनच्या सर्व महिला डॉक्टरांचा समाजासाठी घेत असलेल्या वैद्यकीय सेवेच्या व्रताचा गौरव या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. रेशमा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉ.सुरज पवार यांनी डॉक्टरांना कॅन्सर वरील आधुनिक उपचारांबद्दल माहिती दिली. कॅन्सरचा विळखा जरी वाढत असला तरी आपण त्यावर यशस्वीपणे मात करू शकतो असेही डॉ. सुरज पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील व परिसरातील दोनशेहून अधिक तज्ञ डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सरदार पाटील, डॉ.विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष डॉ. संजय केतकले, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. योगेश अनाप, डॉ.पराग वाटवे, डॉ.किरण बागुल, डॉ.निलेश धामणे, डॉ.प्रसाद तानवडे आदी उपस्थित होते.
Leave a Reply