
गतवर्षा प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक’ या बॉक्सऑफिसवर यशस्वी झालेल्या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीला एक गोड चेहरा दिला. या चेह-यानं एंट्रीलाच प्रेक्षकांवर मोहिनी घालत आपल्या अनोख्या अभिनयशैलीचा जलवा दाखवला आहे. ही अभिनेत्री आहे रितीका श्रोत्री. आपल्या पहिल्याच सिनेमात सर्वांचच लक्ष वेधून घेणारी रितीका आता ‘डार्लिंग’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी काही दिवसांपूर्वाच आपल्या ‘डार्लिंग’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा करत लक्षवेधी मोशन पोस्टर रिलीज केलं होतं. निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांनी 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘डार्लिंग’ सिनेमाची निर्मिती केली आहे. पदार्पणातच रितीकानं केलेला अभिनय आणि आपल्या व्यक्तिरेखेला दिलेला अचूक न्याय यामुळे ‘डार्लिंग’मध्ये ती नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. या सिनेमाच्या सोशल पेजवर एका तरूणीचा क्लॅप हाती घेतलेला परंतु चेहरा दिसत नसलेला फोटो टाकण्यात आला होता, त्यामुळे ही अभिनेत्री नेमकी कोण याबाबत सगळीकडे चर्चा रंगू लागली होती. आता या रहस्यावरून पडदा उठला आहे. रितीकाच ती अभिनेत्री असल्याचं ‘डार्लिंग’च्या साँग टिझरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे रितीका प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका नव्या रूपात भेटणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश यांच्या संगीताची जादू या चित्रपटाद्वारे संगीतरसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
Leave a Reply