
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग अंतर्गत थकबाकीदार मिळकत धारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली असून सदरची मोहिम घरफाळा विभागाच्या जप्ती पथकाने आज आणखी तीव्र राबविली आहे. सदरची मोहिम आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी व कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये असणा-या रिलायन्स जिओ इन्फो कॉम लि या कंपनीच्या टॉवरची मालमत्ता कराची रक्कम सुमारे 24 लाख रूपये धनादेशद्वारे महापालिका तिजोरीत जमा झाली. याचबरोबर महानगरपालिकेच्या पाच नागरी सुविधा केंद्रामध्ये रूपये 25 लाख इतकी जमा झाली आहे.याखेरीज कावळा नाका विभागीय कार्यालय क्रं 4 अंतर्गत करदाता क्रमांक 170138 रूपये 1,24,652/-, करदाता क्रमांक 36977 रूपये 2,33,294/- करदाता क्रमांक 174066 रूपये 1,00,000/-, करदाता क्रमांक 169947 रूपये 1,00,000/-, करदाता क्रमांक 38646 रूपये 1,89,086/- यांचे धनादेश तसेच करदाता क्रमांक 181317 यांचेकडून रूपये 25,000/- जमा करणेत आले आहेत. राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रं. 3 अंतर्गत करदाता क्रमांक 35868 रूपये 40,00,000/-, करदाता क्रमांक 165257 रूपये 1,00,000/-, करदाता क्रमांक 27079 रूपये 3,30,000/- अशी एकूण 1 कोटी इतकी उच्चांकी जमा घरफाळा विभागानी एकाच दिवसात वसूल केली आहे.
Leave a Reply