
कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीच्या वतीने CAA संदर्भात जनजागृतीसाठी विशेष अभियान राबवले जात आहे प्रत्येक मंडलामध्ये कोपरा सभेच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन करण्यात येत आहे. आज याचाच एक भाग म्हणून कसबा बावडा मंडलाच्यावतीने पद्मा पथक चौक येथे जनजागृती सभा संपन्न झाली. सदरCAA जनजागृती सभेस अॅड.केदार मुनिश्वर यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, देशाच्या संसदेत झालेला कायदा रस्त्यावर उतरून सांगाव लागतो हेच दुर्देवाची बाब आहे. हा कायदा पारित झाल्यानंतर देशात यादवी पसरवण्याचे काम सुरु आहे. नरेंद्रजी मोदी व अमित शहा यांनी ज्या पद्धतीने भारत देशात काम केले आहे त्याने सर्व सामान्य लोक खुश आहेत. राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक असे अनेक राष्ट्रहिताचे निर्णय त्यांनी घेतले. महाराष्ट्रा देखील गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्या निमित्याने अनेक योजना लोकांच्या पर्यंत पोचण्यासाठी काम केले आहे. देशाचे पंतप्रधान आज मन कि बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांमधील लोकांच्या सोबत जोडले गेले आहेत. मुस्लीम राष्ट्रांमध्ये केवळ ३ टक्के राहिलेल्या अल्पसंख्यांक लोकांना नागरिकता देणे इतकाच हा कायदा आहे. याद्वारे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना हा देश एकसंघ ठेवण्याचा आहे. काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षांना केवळ नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी अशा अफवा पसरून जनतेत असंतोष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे देश एकसंघ ठेवण्यासाठी भारतीय जनात पार्टीने ठरवले आहे की रस्त्यावर उतरून या कायद्याची जनजागृती लोकांपर्यंत केली पाहिजे.
Leave a Reply