
कोल्हापूर:कोल्हापूरला काल (रविवारी) एका वृद्धाचा मृत्यू झाला. कोरोना सारख्या आजारची लक्षणे दिसून आल्याने त्या रुग्णास कोरोना कक्षात दाखल केले होते.मात्र हा कोरोनाचा संशयित रुग्ण नव्हता. संबंधित रुग्ण टेम्पो चालक आहे. त्याचा परदेश प्रवासाचा देखील इतिहास नाही.असे राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे.त्याला श्वसनाचा त्रास होत होता. पण अजूनही मृत्यू कोणत्या आजाराने झाला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील यांनी सांगितले आहे.त्यामुळे कोल्हापूर मध्ये कोरोनाचा पहिला बळी याबद्दल अजूनही साशंकता असल्याने आज (सोमवारी) सायंकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply