
कोल्हापूर : विरेंद्रसिंह यादव (वय ६८, रा. नागाव फाटा) यांचा मृत्यू जुन्या फुफूसाच्या विकारामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ. बी. सी. केम्पी-पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ. योगेश साळी यांनी आज दिली.या रुग्णास पूर्वीपासून असलेल्या जुन्या फुफुसाच्या आजाराचा कोल्हापुरात आल्यानंतर जास्त त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या स्वॕबचे नमुने घेवून पुणे येथील एन आय व्ही संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सीपीआरमध्ये व्हेंटीलेटरच्या सहाय्याने उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान रविवारी १५ मार्चरोजी सायंकाळी ५ वा त्यांचा मृत्यू झाला.
मृत विरेंद्रसिंह यादव हे कोरोना संशयित रुग्ण या व्याखेत बसत नसल्यामुळे त्यांच्या स्वॕब नमुन्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही, असे पुण्यातील एन आय व्ही संस्थेने कळविले आहे. त्यामुळे तो संशयित कोरोना रुग्ण नाही. त्यांचा मृत्यू जुन्या फुफुसाच्या विकारामुळे झाला आहे.असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. फक्त आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Leave a Reply