जनजागृती करीत मंत्री मुश्रीफांनी चालविला जनता दरबार

 

कागल :ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल मधील घरातील दररोजचा जनता दरबार म्हणजे किमान हजारावर माणसांची उपस्थिती ठरलेलीच, परंतु गेल्या दोन दिवसापासून कोरोना संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी तोंडाला मास्क लावून जनता आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुरू ठेवला. तसेच कार्यकर्त्या भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी मास्क लावण्याबरोबरच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे ही धडे दिले.एरवी घरातीलच हॉलमध्ये मुश्रीफांचा जनता दरबार भरलेला असतो. ज्यांना खाजगी बोलायचं असतं त्यासाठी आठ बाय आठची रूम आहे. परंतु गेल्या आठवडाभर सर्वत्र वाढत चाललेल्या संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावर नामी इलाज शोधला. घरासमोरच्या रिकाम्या जागेत त्यांनी भव्य शामियाना उभारला. दरम्यान फोन वरूनच कागलला येऊ काय ? अशी चौकशी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ममहतंत्री मुश्रीफ आवर्जून सांगत होते की, महत्वाचे काम असेल तर या. अन्यथा मी तुमची कामे फोनवरून करतो. तुम्ही घरीच रहा.यावेळी कार्यकर्त्यांची बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संपूर्ण जगासह भारतातीलही कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत आहे. या रोगाला न घाबरता, न डगमगता सावधगिरी बाळगूया तसेच वैयक्तिकरित्या खबरदारी घेत या महामारीशी हिंमतीने मिळून लढू या, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता , आरोग्य आणि आरोग्यविषयक खबरदारी विशेषता, कोरोना या संसर्गजन्य साथीच्या पार्श्‍वभूमीवर वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याविषयी जनजागृती, आरोग्यसुविधा, मास्क, सॅनिटायझर तसेच इतर आरोग्य व स्वच्छता विषयक साहित्य वाटप यासारखे उपक्रम राबवावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!