
कोल्हापूर: कोल्हापूरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आज डॉ डी वाय पाटील ग्रुपच्यापवतीने एन९५ हे चांगल्या प्रतीचे २ हजार मास्क देण्यात आले.डॉ डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ अभिनव देशमुख यांच्याकडे मास्क सुपूर्द केले.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील आणि पालकमंत्री ना.सतेज (बंटी) डी.पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांसाठी हे मास्क देण्यात आले.यावेळी ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. कोरोनाशी लढताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीपासून स्वतःला दूर ठेवणे महत्वाचे आहे. वर्क फ्रॉम होम संकल्पनेतुन घरी थांबून आपली कामे करणे क्रमप्राप्त बनले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस मात्र कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणी होते, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे.तसेच विमानतळ रेल्वेस्टेशन,रस्ते या ठिकाणी पोलीस बांधव कार्यरत आहेत.ज्या ठिकाणी क्वारंटाईन कक्ष आहेत,अशा ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला आहे.
म्हणूनच या पोलिसांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.या भावनेतून डी.वाय.पाटील ग्रुपतर्फे पोलिसांना मास्क दिले आहेत .
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ.अभिनव देशमुख यांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. समाजाने पोलिसांची काळजी केली तर पोलीस तितक्याच उत्साहाने काम करतात .कोरोनाचा मुकाबला करताना सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी असे आवाहनही डॉ.देशमुख यांनी केले.
Leave a Reply