
कोल्हापूर / प्रतिनिधी : कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी रविवारी म्हणजे आज सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत संचारबंदी म्हणजे जनता कर्फ्यू चे संपूर्ण देशभरात आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडणे टाळले. नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर अजिबात वाहतूक नाही तर माणसांची गर्दी नाही. कोल्हापुरात शहरातील चौकाचौकात काही गर्दी नव्हती.कर्फ्यु सुरू झाल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत तरी रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. भाजी मंडई, बाजारपेठा ओसाड पडल्या होत्या. फेरीवाले, रिक्षा, चारचाकी, दुचाकी चालक यांनी घरीच राहणे पसंत केले. प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अतिशय कमी प्रमाणात एखादी दुचाकी किंवा चारचाकी दिसत होती. पण त्यालाही पोलीस विनंती करत होते. घरी थांबा असे आवाहन करत होते. कोल्हापूर ची लोकल वाहतूक म्हणजे केएमटी बसेस आणि एसटी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती.बस स्टँडसह शहरातील राजारामपुरी, महाद्वार रोड, दाभोळकर कॉर्नर, हायवे उपनगरातील आणि सर्वच रस्त्यांवर ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ ची परिस्थिती बघायला मिळत होती.
Leave a Reply