
कागल :नामदार हसन मुश्रीफ वाढदिवस गौरव समितीच्यावतीने कागल शहरातील नागरिकांसाठी दहा हजार मास्क देण्यात आले. समितीच्यावतीने केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी हे मास्क नगराध्यक्षा सौ माणिक रमेश माळी यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी बोलताना भैय्या माने म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा 66 वा वाढदिवस शुक्रवार दि 2 एप्रिल 2020 रोजी म्हणजेच राम नवमी दिवशी आहे. स्वतः मुश्रीफ यांनी हा वाढदिवस म्हणजे विकास संकल्प दिन व कोरोना संसर्गशी जनजागृती, खबरदारी व सावधगिरीने लढण्याचे व समाज कोरोनामुक्त करण्याच अभियान म्हणून संकल्प केला आहे .दोनच दिवसापूर्वी गुढीपाडव्यादिवशी मंत्री श्री . मुश्रीफ यांनी स्वतःच्या घरासमोर कोरोना मुक्तीची गुढी उभी केल्याचेही सांगतानाच हे सॅनिटरी मास्क गरम पाण्यात धुऊन पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत, असेही श्री माने यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष सतीश घाडगे , चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, नितीन दिंडे, बाबासाहेब नायकवडी आदी उपस्थित होते.
Leave a Reply