अग्निशमन विभागाच्या फायर फायटर द्वारे हायपो सोडियम क्लोराईटची फवारणी

 
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता महापालिकेच्यावतीने  विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आज महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या फायर फायटर द्वारे देवकर पाणंद मेनरोड, सुर्वे नगर रिंगरोड, जिवबानाना जाधव पार्क, कणेरकर नगर, फुलेवाडी 1 ते 6 वा बसस्टॉप रोड, शाहूपूरी पूर्ण रोड, राजेंद्रनगर रोड या परिसर ठिकाणी हायपो सोडियम क्लोराईटची औषध फवारणी करण्यात आली आहे.  तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आज शहरात चार ट्रॅक्टरद्वारे ताराबाई पार्क, सानेगुरुजी वसहात, रुईकर कॉलणी, गजानन महाराज नगर या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. 
तसेच आज विभागीय कार्यालय क्र.1 अंतर्गत भाजी मार्केटचे विकिंद्रीकरण करण्याच्या दृष्टीणे  देवकर पाणंद पेट्रोल पपंरोड, नानापाटील नगर, राजोपाध्ये नगर, सानेगुरुजी वसाहत, तुळजा भवानी मंदिर रोड, रायगड कॉलनी या ठिकाणी ठरावीक अंतरावर भाजी विक्रेते बसविण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत ताराबाई रोड, साकोली कॉर्नन, रंकाळा एसटी स्टँड ते पापाची तिकटी, लक्ष्मीपूर मेनरोड विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत रेल्वे फाटक जवळील भाजी विक्रेतांना लॉ कॉलेज जवळील रस्त्यावर बसविण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.4 अंतर्गत धैर्यशिल माने चौक ते पितळी गणपती रोड, जनता बाजार चौक राजारामपूरी या ठिकाणी ठरावीक अंतरावर भाजी विक्रेते बसविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!