
कोल्हापूर:कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत. जीवाचे रान करून सेवा बजावणार्या पोलिसांना उंचगाव फाटा, उंचगाव हायवे ब्रिज, तावडे हाँटेल चौक परिसरात, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना यांच्या वतीने चहापान देण्यात आले. या वेळी पोलिसांना सनातन निर्मित भीमसेनी कापराचे महत्त्व सांगून त्यांना तो देण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी पोलिसांना नामजपाचे महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमात शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, युवासेना तालुकाप्रमुख संतोष विभूते, दत्तात्रय विभूते यांचा सहभाग होता.
Leave a Reply